Wednesday, May 20, 2020

कोरोना गीत

                              *गीत*


कोरोना आला.......


कोरोना आला आलाय चायना मधून,

धुमाकूळ घातलाय जगावं सावध होवून !!ध्रु!!

 कोविड१९ त्याचे हो नाव

 लहान-थोरांना कोरोना ठावं

इराण,इटली,अमेरिका गेले हादरून!!१!!

  सर्दी,खोकला,डोकेदुखी

  घशात खवखव,पोटदुखी

ताप असेल तर घ्यावा उपचार करून!!२!!

  सोबत असावा नेहमी रूमाल

  शिंकता,खोकता वापर कराल

बाहेरून येता घ्यावेत हात धुवून!!३!!

  गर्दीच्या ठिकाणी जावूच नका

  लक्षणे दिसता घाबरू नका

मृत्यूचे केवळ ३-४%च प्रमाण!!४!!


   श्री.लंघे गणेश अण्णासाहेब 

(तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक नेवासा जि.अहमदनगर)

No comments:

Post a Comment