- दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत,शाळा शहरांतून आलेल्या लोकांना कोरोन्टाईन करण्यासाठी वापरत आहेत,शिक्षकांना कोरोना प्रतिरोधाची कामे दिली आहेत,त्यामुळे येणारं २०२०-२१ शैक्षणिक वर्ष असंख्य आव्हानांनी भरलेलं आहे,यात तिळमात्र शंका नाही.शाळा कधी उघडणार?कशा स्वरूपात सुरू राहणार?पाठ्यपुस्तके,वह्या,इतर अत्यावश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल का?पालक पाल्यांना शाळेत पाठवण्याचा धोका पत्करतात का?गरीब पालक खासकरून मुलींना काही अडचणी वाढू नयेत म्हेहणून घरी ठेवण्याची तसेच अडचणींमुळे कामावर घेऊन जाण्आयाची दाट शक्यता नाकारता येत नाही,या सर्व समस्यांना बघणे ही महत्त्वाचे ठरेल.तरीही जागतिक स्थिती बघता भारतात कोरोनाची पठारावस्था आणि उतरती कळा येण्यास जुलै मध्यापासून सुरूवात होईल असे वाटते.
- या सर्व परिस्थितीत शिक्षणाचे स्वरूप कसे राहील?सोशिअल डिस्टंस बाळगून परिपाठ घेणे,वर्ग भरवणे,शिकवणे,खेळ घेणे,अभ्यास घेणे मोठेच आव्हानात्मक असणार आहे .एखाद्या विद्यार्थ्यास काही लक्षणे आढळली तर लगेच विलगिकरण करून हॉस्पिटलमध्ये भरती करणे ग्रामिण भागासाठी आव्हान असणार आहे.सर्व सांभाळून गुणवत्तापूर्ण,आनंददायी शिक्षण देणे हे शिक्षकांसाठी नवे आव्हान ठरणार हे निश्चित!
- अलिकडेच चीन मधील शाळेत विद्यार्थीनीचा प्रवेश दाखवणारा व्हिडिओ बघितला.त्यात ती मुलगी आई सोबत येते,मास्क कचराकुंडीत टाकते,हात सॕनिटायझरने साफ करते,मग तिला पंपाने फवारा देवून संपूर्ण सॕनिटायझ केले जाते आणि मग ती शाळेत प्रवेश करते.तरी ही प्रश्न अनुत्तरीत राहतातच की,वरच्या बाजून सॕनिटायझ केले तरी पिशवीतील साहित्याचे काय?तिच्या जेवणाच्याडब्याचे काय?
- खास करून प्राथमिक शाळांतील विद्यार्थी ६ ते १४ वयोगटातील आहेत,त्यातही ६ ते १० वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि चालू स्थितीत पालकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याने यावर्षी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.विद्यार्थी संख्या वाढली तरी शिक्षक संख्या पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
- विद्यार्थ्यांसाठी पाठ्यघटकानुसार लागणारे नित्याचे शैक्षणिक साहित्य बनवतांना शिक्षकांची कच्च्या साहित्याच्या अभावाने धांदल उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गेल्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी आलेला हा कोरोना नव्या शैक्षणिक वर्षासाठी असंख्य आव्हाने घेऊन आला आहे,त्यातून मार्ग काढणं कठीण असलं तरी अशक्य नाही,हे ही तितकचं खरं!
- गरज ही शोधाची जननी आहे. समस्येचं स्वरूप समजल्याशिवाय उपाय शोधणे अशक्य होते,निरर्थक ठरते.
- शासनाने घर घर होगी पढाई उपक्रमांतर्गत ११ मे पासून डिडी नॕशनल चॕनल वर १ली ते १२वी पर्यंतसाठी अभ्यासवर्ग सुरू केले आहेत.बहुतेक शाळेतील प्रत्येक वर्गाचे Whats app ग्रुप बनवून स्टडी फ्र्ॉम होम हा ही उपक्रम सुरू आहे.काही शिक्षक Live येवून तर काही Video बनवून पाठवून अभ्यास घेत आहेत.
- यात किती विद्यार्थ्यांपर्यंत कळकळीनं अभ्यास पोहचतो?करून घेतला जातो?हे तपासणं मोठ आव्हान असलं तरी हा भविष्यातील एक चांगला पूरक पर्याय ठरू शकतो,कारण यात शिक्षक,पालक,विद्यार्थी आणि आध्ययन-अध्यापन घटक यांचा प्रत्यक्षच संबंध येतो.शिक्षक-पालक संघ,माता-पालक संघ,पालक भेटी यापूर्वी जरी असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी स्टडी फ्र्ॉम होम मधून होणार हे निश्चित!
- बहुतेक शाळांना पाणी उपलब्धता,शौचालय,विद्यूत पुरवठा,पोषण आहार,पूरक आहार या सुविधा पुरवल्या असल्या तरी आता मास्क, सॕनिटायझर,फवारणीयंत्र,हँडवॉश,सोशिअल डिस्टंस साठी सुविधा पुरवणं अगत्याच ठरणार आहे.
- "येणारं दशक भारताच्या उत्कर्षाचं असणार आहे" असं बिलगेट्स आणि अन्य अर्थतज्ज्ञ ठरवत असतांना पुढची परिपूर्ण पिढी देणं हे शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हान आपणा सर्वांना मिळून पेलवायचं आहे आणि त्यात यशस्वी व्हायचेच आहे,हे ही तितकेच खरे!
- शिक्षण म्हणजे,to draw out!आतील सुप्त कलागुणांना बाहेर काढणे.कोरोना या जागतिक महामारीच्या रुपाने नव्या पिढीला शिकण्यासाठी खूप आहे.त्यातून वैश्विक संकट,वैयक्तिक स्वच्छता,राष्ट्रनिष्ठा,राष्ट्रीय जबाबदाऱ्या अशा असंख्य गुणांना सहज अंगिकारने शक्य होणार आहे.समस्यांना संधीत परावर्तीत करण्याची ही वेळ आहे.त्यातूनच उद्याचा जगद्गुरू भारत निर्माण होईल,यात शंका नाही.
- श्री.लंघे गणेश अण्णासाहेब (तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक नेवासा जि.अहमदनगर)
No comments:
Post a Comment